आताच्या काळात प्रत्येकाला बाहेरचे चमचमीत, स्वादिष्ट पदार्थ खायला आवडतात. मग त्यामध्ये लहान मुले असो, तरुणाई असो किंवा ज्येष्ठ लोक असोत, यातील प्रत्येकाला बाहेरच्या चवीष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडतोच. काही हौशी खवय्ये तर नवनवीन स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एखाद्या प्रसिद्ध हॅाटेलच्या शोधात असतात, तर अशाच खवय्यांसाठी हॅाटेल दोस्ती’ हे हॅाटेल ५ वर्षांपासून प्रसिद्ध आहे. गुलाब (आप्पा) आल्हाट यांचे हे हॅाटेल आहे. हॅाटेल दोस्ती हे मोशी चौक बापूजी मंदिराशेजारी भगीरथी सोसायटीच्या बाजूला, पुणे-नाशिक हायवेशेजारी, मोशी येथे आहे.
हॅाटेल दोस्ती या हॅाटेलची स्पेशल दही-मिसळ ही खासियत आहे. तसेच या हॅाटेलमध्ये स्पेशल मिसळसोबत वडापाव आणि फक्कड असा चहादेखील मिळतो. तसेच या हॅाटेलमध्ये येणारा प्रत्येक खवय्या हा येथील पदार्थांची चव घेऊन खुश तर होतोच, पण तिथले आदरातिथ्य त्यांना या हॅाटेलमध्ये पुन्हा पुन्हा यायला भाग पाडते.
तसेच हॅाटेल दोस्तीबद्दल विशेष सांगायचे झाले तर या हॅाटेलमध्ये मिळणारे सर्व पदार्थ सर्वसामान्यांपासून सर्वांच्याच खिशाला परवडतील अशा दरात मिळतात. त्यामुळे येथे खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते. त्यामुळे खवय्यांना चमचमीत पदार्थ खायची चव सुटली असेल किंवा सुटीचा दिवस असो किंवा इतर वेळी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, परिवारासोबत टाईम स्पेंड करायचा असेल किंवा पार्टी करायची असेल तर आवर्जून हॅाटेल दोस्तीला स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी भेट द्या.