काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये उपक्रम
पुणे : शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये एक नवा उपक्रम राबवण्यात आला. त्याअंतर्गत सिंहगडमध्ये शिक्षण पूर्ण झालेल्या व परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे.
2015 साली स्थापन झालेल्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी, पदवी शिक्षण पूर्ण करून जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. वेगवेगळ्या देशातली प्रवेश प्रक्रिया निराळी असून त्याबद्दल विद्यार्थ्यांना विस्तीर्ण माहिती देण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित केला होता.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व्हावे याकरिता हा कार्यक्रम ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. तसेच हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला करण्यात आल्यामुळे सिंहगडच नव्हे तर इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना ही फायदा झाला.
विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी सहा देशातील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या वा पूर्ण झालेल्या सात विद्यार्थ्यांना अनुक्रमे कु. श्रुती चव्हाण, इलिनोईस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिकागो, यु. एस. ए., कु. समृद्धी गोलगिरे, नोर्थुंब्रिया यूनिवर्सिटी न्यू कासल, युके, सौरभ दळवी युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन, आयर्लंड, कु. प्रतीक्षा पाटील, एमिटीयुनिव्हर्सिटी, मुंबई, भारत, यांना प्रत्यक्ष, तर कु. ऐश्वर्या कोंढारे टेक्निटकल युनिव्हर्सिटी डॉर्टमंड जर्मनी, कु. दर्शी गोहेल, युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया, ॲडलेड, आणि कु. सौरभ अभोणकर एस. पी. ए. भोपाळ यांना ऑनलाईन, आमंत्रित करण्यात आले होते.