अब्दुनं केलेल्या आरोपांवर स्टॅनच्या टीमकडून उत्तर; म्हणाले, “बिग बाॅस संपल्यानंतर…”

मुंबई | Mc Stan – गेल्या काही दिवसांपासून अब्दु रोझिक (Abdu Rozik) आणि एमसी स्टॅन (Mc Stan) यांच्यात वाद सुरू आहे. अब्दु आणि स्टॅन यांच्या मैत्रीत फूट पडली आहे. त्यामुळे आता ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) च्या घरात तयार झालेली मंडली तुटणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तसंच स्टॅन माझे फोन उचलत नसून माझ्याविरोधात काहीही अफवा पसरवत असल्याचा आरोप अब्दुनं केला होता. अशातच अब्दुनं स्टॅनच्या मॅनेजरवर आरोप केले आहेत. याबाबत अब्दुच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे.

या निवेदनातून अब्दु रोझिकनं एमसी स्टॅनच्या मॅनेजरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “अब्दु आणि स्टॅन 11 मार्चला बंगळूरमध्ये होते. त्यावेळी अब्दुनं स्टॅनच्या मॅनेजरला त्याच्या काॅन्सर्टमध्ये उपस्थित राहून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, अब्दुसोबत काॅन्सर्ट करण्यास स्टॅन इच्छुक नसल्याचं त्याच्या मॅनेजरनं सांगितलं. तरीही अब्दुनं तिकीट काढून स्टॅनच्या काॅन्सर्टला उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न केला. पण स्टॅननं त्याच्या मॅनेजरला सांगून अब्दुला काॅन्सर्टमधून बाहेर काढायला सांगितल. तसंच त्याच्या कारचं पॅनल तोडून त्याचं नुकसानही करण्यास सांगितलं”, असं त्या निवेदनात म्हटलं आहे.

पुढे निवेदनात म्हटलं आहे की, “स्टॅनच्या आईसोबत अब्दुनं फोटो न काढल्यामुळे तो नाराज असल्याचं मंडलीमधील इतर सदस्यांनी सांगितलं होतं. पण, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अब्दुनं स्टॅनच्या आईला कॉल केला होता. तो व्यवस्थित खेळत असल्याचं त्यानं स्टॅनच्या आईला सांगितलं होतं.”

आता याबाबत एमसी स्टॅनच्या टीमनं भाष्य केलं आहे. एमसीच्या जवळच्या व्यक्तीनं सांगितलं की, “‘बिग बॉस 16’ संपल्यानंतर स्टॅन त्याच्या टूरमध्ये व्यस्त झाला आहे. तो एक स्वतंत्र्य कलाकार असून त्यानं नेहमीच एकट्याने परफॉर्म केले आहेत. तो कोणाबरोबरच एकत्रित परफॉर्म करू इच्छित नाही. अब्दुचा बंगळुर कॉन्सर्टदरम्यान अपमान करणं, तसंच त्याच्या कारचं पॅनल तोडणं या सगळ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाहीये. कोणी असं का करेल? हे सगळे आरोप खोटे आहेत.”

Sumitra nalawade: