खाण्याचे नवनवीन पदार्थ म्हटलं की, सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहात नाही. मग तो पदार्थ तिखट, गोड, आंबट असो. त्यातल्या त्यात झणझणीत नॉनव्हेज आणि व्हेज पदार्थ खाण्यासाठी आपण कितीही किलोमीटरचा प्रवास करून त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार असतो. तर असे हौशी खाद्यप्रेमी एखाद्या प्रसिद्ध हॉटेलच्या शोधात असतात. अशाच खवय्यांसाठी ‘चवदार कोकण’ हे हॅाटेल प्रसिद्ध आहे. चवदार कोकण हे हॅाटेल संदीप वसंत झुजम व विजय ठिगळे यांचं हॉटेल आहे. हे हॉटेल पुणे-नाशिक हायवे, तुकईवाडी, राजगुरुनगर येथे आहे. विशेष म्हणजे हे हॉटेल कमी कालावधीत सर्वांच्या पसंतीचं हॉटेल बनलं आहे.
चवदार कोकण या हॉटेलमध्ये येणाऱ्या खवय्यांकडून होणारे पदार्थांचे कौतुक आणि दर्जेदार पदार्थांची चव हीच तर त्यांची खासियत आहे. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक खवय्या हा पदार्थाची चव चाखून खूश तर होतोच, पण तिथले आदरातिथ्य त्यांना चवदार कोकण हॉटेलमध्ये पुन्हा -पुन्हा यायला भाग पाडतं. तसंच चवदार कोकण या हॉटेलची चिकन फ्राय, चिकन कोळीवाडा, मटन फ्राय, कोळंबी खर्डा, सुरमई करी, पापलेट करी, काजु मसाला, काजु करी, पनीर मसाला, मटर पनीर, व्हेज कोल्हापूरी, सोलकडी असे अनेक पदार्थ ही त्यांची स्पेशालिटी आहे. तसंच या हॉटेलमध्ये तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, इंद्रायणी भात घरगुती पद्धतीचे मिळतात. सर्वसामान्य लोकांना परवडेल आणि अत्यंत रूचकर असं जेवण तेथे मिळते. अत्यंत शुद्ध आणि दर्जेदार मसाले, कायम ताजे आणि नॉनव्हेज वापरून बनवलेले पदार्थ खाऊन तेथे जाणारे सर्व खवय्ये आनंदी होतात. पुण्याला भेट देणाऱ्या हौशी खवय्यांनासुद्धा चवदार कोकण हॉटेलने भुरळ घातली आहे.
चवदार कोकण या हॉटेलमध्ये बसण्यासाठी अगदी प्रशस्त जागा, स्वच्छता, रुचकर जेवण आणि तुम्हाला हवे ते सर्व व्हेज-नॉनव्हेज पदार्थ एकाच ठिकाणी मिळतात. तर तुम्हालाही कोकणातील घरगुती चवीचं जेवण जेवायचं असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत किंवा वाढदिवस पार्टी करायची असेल तर उत्तम आणि दर्जेदार पदार्थ खायला चवदार कोकण हॉटेलला नक्की भेट द्या.