लोकसहभागातून ‘लक्ष भोजन’

पुणे | Pune News – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, एक ऑगस्ट रोजी सारसबागेजवळील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ लक्ष भोजनाचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी अनेक भीमसैनिकांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी यथाशक्ती मदत केली आहे. अनेक संघटनांनी एक रुपया ज्ञाती बांधवांसाठी असे उपक्रम अंतर्गत राबवले. रोख रक्कम, भोजनाची सामग्री, वस्तू सेवा या स्वरूपामध्ये हजारो लोकांचे हात या उपक्रमासाठी राबवत आहेत. उद्या लोकशाही अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे. या निमित्ताने लोकसहभागातून लोकसेवा या उपक्रमातून लाखो अनुयायांना स्नेहभोजन उपक्रम राबविला जाणार आहे .

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कृती समिती, लोकसेवा प्रतिष्ठान, मित्रपरिवारचे दीपक पायगुडे, भीम योद्धा फाउंडेशनचे ऍड. मंदार जोशी आदींच्या माध्यमातून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये लाखो लोक या एकता महोत्सवांमध्ये सहभाग घेतात. एकत्रित येऊन अनुयायांनी भोजन करणे आणि एकमेकांच्या संवेदना जाणून घेणे ही या आयोजनाच्या पाठीमागची भूमिका आहे. या उपक्रमाचे नियोजन ललित तींडे आणि सारंग सराफ हे पाहत आहेत

admin: