पुरस्कार जबाबदारी वाढवतात : महाजन

पुणे : ‘पुरस्सर म्हणजे पुढे जात रहा असे सांगणारे पुरस्कार असतात. त्यामुळे ते मिळाल्यावर जबाबदारी वाढते आणि पुढील कामासाठी प्रेरणा मिळत असते. आपल्या पुढील कामासाठीचे असलेले भान पुरस्कार देत असतात, असे मत लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले.

आत्मोन्नती विश्वशांती साधक संस्था व माईर्स एम आय टी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदिशक्ती मुक्ताई स्मृतिगौरव व समाजभूषण गौरव सोहळ्यास त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. संतसाहित्याचे अभ्यासक व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.या वेळी कोहिनूर ग्रुपचे सर्वेसर्वा कृष्णकुमार गोयल, दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष माणिकराव चव्हाण, माईर्स एम.आय.टी.च्या सुचित्रा कराड, संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. सोपनकाका वाल्हेकरमहाराज, कार्याध्यक्ष नागेश मोरे, संपर्क अधिकारी सत्यजित खांडगे मान्यवर उपस्थित होते.

आज भारतभर इंदूरचे स्वच्छ शहर म्हणून कौतुक होते. कारण आम्ही कचरा दाखविणारे लोक नाही, तर पुढे होऊन कचरा गोळा करून स्वच्छता करणारे आहोत. म्हणून इंदूर आज अनेक वर्षे सलग पहिला क्रमांक मिळवित आहे. पुरस्कारार्थीनी असे पुढे येऊन आपापल्या क्षेत्रात काम करावे म्हणजे भारत महासत्ता म्हणून लवकर पुढे जाईल, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या.
संत शब्द पोथ्या पुराणांत वाचतो पण या संतत्वाची खरी व्याख्या करणाऱ्या संत मुक्ताबाई आहेत. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे कामाची योग्य पावतीच, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

Dnyaneshwar: