‘शेतकरी उपाशी नेते मात्र तुपाशी’, कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा दौऱ्यात शाही थाट!

परभणी : (Aadity Thackeray On Abdul Sattar) दोन आठवड्यापुर्वी झालेल्या परतीच्या पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. सरकारच्या मदतीची वाट पहाणाऱ्या बळीराजाच्या बदरात काही पडणार की, नाही अशी शंका निर्माण झाली आहे. जगाच्या पोशिंद्याला उपाशी राहण्याची वेळी आली असताना नेते मात्र, तुपाशी म्हणण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, नुकसानग्रस्त भागाची पहाणी करण्याचा देखावा करणाऱ्या कृषीमंत्र्याचा मात्र, अजबच शाही थाट होताना दिसत आहे. बीड दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांना ‘दारु पिता का?’ म्हणून विचारणारे अब्दूल सत्तार परभणी दौऱ्यात निराळ्याच शाही थाटात समोर आले आहेत. विशेष म्हणजे सत्तारांनी केलेल्या ट्विटमध्ये या सर्व गोष्टी त्यांच्या समोर दिसत आहेत. त्यामुळे विरोधकांना शिंदे गटावर बोलण्याचे आयते कोलीत मिळाले आहे.

सत्तारांचा शाही थाट काही झाकून राहिला नाही, त्यांचे अनेक दौरे या ना त्या कारणामुळे सतत वादात सापडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नेत्यांच्या दौऱ्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून देखील अशी सोय केली जाते. आता असाच काही प्रकार कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या परभणीच्या दौऱ्यात पाहायला मिळाला आहे. परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसानीबाबत आढावा बैठकीत सत्तार यांच्यासाठी चक्क काजू-बदामची सोय करण्यात आली होती. त्यामुळे आता यावरून सत्तार यांच्यावर टीका केली जात आहे. 

Prakash Harale: