आयते कोंडीत सापडलेल्या भाजपला; शिवसेनेचं ‘ठाकरी’ भाषेत उत्तर

मुंबई : (Aaditya Thackeray On Apposition Leader BJP) शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर वारंवार करण्यात येणाऱ्या पेंग्विन नावाच्या टिकेला आज त्यांनी चोख प्रतिउत्तर दिलं आहे. यावेळी ते म्हणाले, हो पेंग्विन नावाचा आपल्याला अभिमान असल्याचे म्हणाले. तुमच्या टिकेमुळमे पेंग्विन जिजामाता उद्यान प्राॅफिटमध्ये आले असा टोलाही त्यांनी लागवला.

दरम्यान यावेळी त्यांनी सुरु असलेल्या याकूब मेमनच्या कबरीवरील वादावरुन विरोधकांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. काही गोष्टी जनतेसमोर येणं गरजेचं असून, याकूब मेमनला ज्यावेळी 2015 मध्ये फाशी देण्यात आली. त्यानंतर त्याच दफन मान सन्मानाने झाल्याचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते. ज्याप्रमाणे अजमल कसाबला समुद्रात दफन करण्यात आलं तसंच मेमनच्या बाबतीत का नाही झालं? असा सवाल आदित्य ठाकरेंनी यावेळी उपस्थित केलाय. यामुळे शिवसेनेवर आरोप करणारे भाजपचे नेते आयते कोंडीत सापडले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, ज्यावेळी मेमनची बाॅडी संबंधित लोकांकडे देण्यात आली ते पूर्णपणे खासगी होते. यात महापालिकेचा कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्याची बाॅडी देताना कोणत्याही प्रकारजी एनओसी घेतली गेली नाही. निवडणुका जवळ आल्या की असे मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जात असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Prakash Harale: