‘मविआ’च्या ‘पन्नास खोके एकदम ओके’ घोषणामुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढली!

मुंबई : (Aaditya Thackeray On Eknath Shinde Group) एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केली. त्यामुळं मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंच्या खालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली नवं सरकार स्थापन झालं. मात्र, ‘पन्नास खोके एकदम ओके, ही शिवसेनेने दिलेला नारा केही केल्या थांबायला तयार नाहीत. याउलट तो राज्याच्या तळागाळात अधिक क्षमतेने प्रसिद्ध होताना दिसत आहे. आता हाच ’50 खोके एकदम ओके’ नारा शिंदे सरकारसाठी डोकेदुखी बनल्याचे वारंवार दिसून येत आहे.

दरम्यान, गेल्या चार महिन्यात या आरोपामुळे शिंदे सरकारवर नामुष्कीची वेळ ओढावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली. त्याचं कारणही हे ’50 खोके एकदम ओके’ ही घोषणाच ठरली. गेल्या चार महिन्यात या पन्नास खोक्यावरुन राज्यात राजकारण आणि वाद रंगला आहे. बरं 50 खोक्यांच्या आरोपामुळे अब्दुल सत्तार एकटेच चिडलेत असं नाहीत. यापूर्वी अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही खोक्यामुळे डोकेदुखी सहन करावी लागली. लग्नात गेलो तरीही खोकेवाले आमदार आले असं म्हणतात, अशी खंत बच्चू कडूंनी माझा कट्ट्यावर बोलून दाखवली.

गेल्या अधिवेशनात थेट विधिमंडळाच्या पायऱ्यावरही 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दुमदुमल्या होत्या. राज्याच्या इतिहासात कधी झाला नसेल एवढा गदारोळ 50 खोक्यांवरुन विधिमंडळाच्या पायऱ्यावर बघायला मिळाला. शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे आमदार यावरुनच एकमेकांना भिडले देखील होते.

गेल्या काही दिवसात 50 खोके एकदम ओके ही घोषणा राज्यभर पोहोचली. कोणी बैलांना रंगवताना 50 खोके एकदम ओके घोषणा लिहिली तर कोणी रांगोळीत. काहींनी तर गद्दार थाळीही काढली होती. उद्धव ठाकरे यांनी तर शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात शिंदे गटातील आमदारांचा खोकासूर म्हणत उल्लेख केला होता. एवढंच नाही तर शिवाजी पार्कवर यंदा 50 खोक्याचा रावणही जाळण्यात आला.

 

Prakash Harale: