“लाज उरली असेल तर राजीनामे द्या”; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची डरकाळी!

मुंबई – Aaditya Thackeray on Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये जात आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रेदरम्यान भिवंडी ग्रामीण क्षेत्रात आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली.

उठाव करायचा होता तर गुवाहाटी, सुरतेला पळून गेले नसते. तिथे गेला आहात तर आनंदी राहा. दु:ख इतकेच आहे की तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसले. थोडी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. निवडणूकीला सामोरे जा. जे शिवसैनिक परतणार असतील त्यांच्यासाठी आमची दारे उघडे असतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कोसळणार आहे. यांचे काम फक्त धमक्या देण्याचे आहे. परंतु शिवसैनिक घाबरत नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

RashtraSanchar: