बंडखोर शंभूराज देसाईंचे वाढणार टेन्शन; ठाकरेंच्या ‘शिवसंवाद’ यात्रेला शिवसैनिकांची ‘तुफान’ गर्दी!

सातारा : (Aaditya Thackeray On Rebel MLA Shinde Group) एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ‘शिवसंवाद’ निष्ठा यात्रा सध्या सुरु आहे. आज बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात आदित्य ठाकरे दाखल झाले. यावेळी हजारो शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. त्यांच्या स्वागताला जमलेली गर्दीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. उपस्थितांचा उत्साह पाहून आदित्य ठाकरे यांनीही दणकेबाज भाषण केलं.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना फोडण्याचं राजकारण सुरु आहे, ठाकरे परिवाराला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. नागरिकांची एकजूट, हिंदुत्वाची एकजूट, शिवसैनिकांची एकजूट, तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण हे कोणाला शक्य होणार नाही. बंधू भगिनींनो गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असं आवाहन करताना आपलं प्रेम आणि आशीर्वाद ठाकरे कुटुंबावर असू द्यात, अशी साद आदित्य ठाकरे यांनी जमलेल्या हजारो उपस्थितांना घातली.

पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. आता त्यांना आपलं म्हणावं की नाही, असा प्रश्न पडतो. कारण आता त्यांनी ठाकरे कुटुंबाचे फोटो आपल्या कार्यालयातूनल काढून टाकणे सुरु केले आहे. ज्यांनी आपल्याशी गद्दारी केली आहे, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, त्याच इराद्याने मी तुमच्यापर्यंत आलो आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Prakash Harale: