शिवसेनेचं पाऊल राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेनं? आदित्य ठाकरे प्रमुख नेत्यांसह बिहार दौऱ्यावर!

मुंबई : (Aaditya Thackeray On Tejaswi Yadav) शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे बुधवार दी. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी एक दिवसीय बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते पटना येथे बिहारचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या, खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण कमालीच तापलेलं आहे. राज्यपाल कोश्यारी, आणि भाजपचे राष्टीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्तेही आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जात असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याचं निश्चित कारण काय? असाही प्रश्न अनेकजण विचारत आहेत. यावर शिवसेनेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात उत्तर देण्यात आलंय. यानुसार, आदित्य ठाकरेंची हा बिहार दौरा केवळ सदिच्छा भेटीसाठी आहे. मात्र, शिवसेना विरोधकांची जुळवाजुळव करत, राष्ट्रीय राजकारणाच्या देशेने पाऊल टाकू पाहात आहे का? असा यानिमित्ताने प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Prakash Harale: