आनंद दिघे आणि ठाकरेंच्या जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा देणारा फोटो होतोय व्हायरल!

मुंबई : (Aaditya Thackeray Tweet Viral Image) शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे. जो सध्या राज्यात चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमधून धर्मवीर आनंद दिघे आणि ठाकरे कुटुंबातील दिसून येत आहे.

दोन महिन्यांपुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली अन् तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. रस्ते अपघातानंतर २६ ऑगस्ट २००१ रोजी त्यांचं रुग्णालयात निधन झालं होतं. आनंद दिघे यांचा आज स्मृतिदिन आहे, त्यांच्या आठवणींना त्यांचे कार्यकर्त्यांनी उजाळा दिला आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करुन त्यांना अभिवादन केलं आहे.

आनंद दिघे यांना अभिवादन करताना आदित्य ठाकरे यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत आनंद दिघे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत. हा फोटो नवरात्रोत्सवातील असल्याचं दिसून येतं. आदित्य ठाकरेंनी यामाध्यमातून आनंद दिघे यांच्या सोबतच्या ठाकरे कुटुंबीय आणि आनंद दिघे यांच्यातील आठवणींना उजाळा दिला आहे.

Prakash Harale: