“जर कोणाला चित्रपट बघायचा नसेल तर…”, ‘लाल सिंग चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर आमिर खानची प्रतिक्रिया

मुंबई | Aamir Khan Reaction On Lal Singh Chaddha Movie Boycott Trend – बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. आमिर तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर आगमन पुनरागमन करत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या आमिर खान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसंच ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत आमिरने पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे.

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर दाखल होण्यापूर्वीच प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. एका प्रमोशनल कार्यक्रमामध्ये आमिरला ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड आणि तसंच चित्रपटाबाबत होणाऱ्या नकारात्मक चर्चांबाबत विचारण्यात आलं. यावर आमिरने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

आमिर म्हणाला की, “कोणत्याही गाष्टीबाबत मी कोणाचंही मन दुखावलं असेल तर त्याचं मला दु:ख आहे. मला कोणालाही दुखवायचं नाही. जर कोणाला चित्रपट बघायचा नसेल तर मी त्यांच्या भावनांचा आदर करतो.”

“जेव्हा लोक बॉलीवूड आणि ‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. खासकरून लोक माझ्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी यासाठी करतात कारण, त्यांच्या मते मला भारत देश आवडत नाही. माझं आपल्या देशावर प्रेम नाही. पण हे सत्य नाही. काही लोकांना असं वाटतं की मी देश आवडत नसलेल्या व्यक्तींपैकी आहे आणि हे खूपच दुर्दैवी आहे. मी विनंती करतो की कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. माझा चित्रपट पाहा.” असं देखील आमिरने म्हटलं आहे.

Sumitra nalawade: