“संपूर्ण शोमध्ये माझा अपमान…”, ‘काॅफी विथ करण 7’ बद्दल आमिर खानचं खळबळजनक विधान!

मुंबई | Aamir Khan Talk On ‘Koffee With Karan 7’ – सध्या करण जोहरचा ‘काॅफी विथ करण 7’ हा प्रसिद्ध चॅट शो चांगलाच चर्चेत आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चॅट शोमध्ये आत्तापर्यंत सारा अली खान, जान्हवी कपूर, अक्षय कुमार, समंथा, आलिया भट्ट, रणवीर सिंग अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता या शोच्या आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूड मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि करीना कपूर दिसणार आहे. नुकताच नव्या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून यामध्ये आमिर खाननं एक खळबळजनक विधान केलं आहे.

करण जोहरनं हा प्रोमो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आमिरची खिल्ली उडवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये करीना आमिरला म्हणताना दिसते की, अक्षय त्याच्या चित्रपटाचे शूटिंग 30 दिवसांत पूर्ण करतो, आणि तू तर 100-200 दिवस घालवतो. एवढंच नाही तर करीना आमिरच्या ड्रेसिंग सेन्सबद्दलही बोलताना दिसत आहे. ती आमिरला अजिबात ड्रेसिंग सेन्स नसल्याचं बोलताना दिसते. ज्यावर आमिर खान हसत करणला म्हणतो की, जेव्हाही तू शो करतोस तेव्हा कोणाचा ना कोणाचा अपमान होतो. आता करीना सातत्याने संपूर्ण शोमध्ये माझा अपमान करत आहे.

दरम्यान, आमिर आणि करीना यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट 11 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे.

Sumitra nalawade: