मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांची जंगी तयारी; 200 बसगाड्या केल्या बुक

छत्रपती संभाजीनगर | Dasara Melava : उद्या (24 ऑक्टोबर) दसऱ्याच्या पार्श्वभूमिवर ठाकरे गटाचा (Thackeray Group) आणि शिंदे गटाचा (Shinde Group) दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाचा मेळावा पार पडणार आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा मेळावा पार पडणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी जंगी तयारी केल्याचं पाहायला मिळतंय.

मुख्यमंत्री शिंदेंच्या दसरा मेळ्याव्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठी तयारी केली आहे. त्यांनी मेळाव्यासाठी एसटी महामंडळाच्या दोनशे बसगाड्या बुक केल्या असल्याची माहिती विभाग नियंत्रक क्षीरसागर यांनी दिली आहे. त्यामुळे सत्तारांनी बुक केलल्या या बसेस सोमवारपासून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यापेक्षा जास्त गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून गर्दी जमवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी राज्यातील सर्वसामान्यांना मुंबईत घेऊन येण्याची जबाबदारी शिंदे गटातील अनेक मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.

तर उद्या होणाऱ्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे. तसंच आता कोणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Sumitra nalawade: