राहुरी | Abdul Sattar On Ambadas Danve – विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) टीकास्त्र सोडलं आहे. “आमदार वाणीसाहेब असते तर खोके घेणाऱ्यांना बुटानं मारलं असतं”, असं अंबादास दानवे वैजापूरच्या सभेत बोलताना म्हणाले होते. यावर आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या त्यांनाच बुटानं मारलं पाहिजे”, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. राहुरीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 36वा पदवीदान समारंभ पार पडला. या समारंभामध्ये ते बोलत होते.
“ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या त्यांनाच बुटानं मारलं पाहिजे. हिंदू धर्मानं त्यांना दोन बायका करण्याचा अधिकार दिलाय का? जर अधिकार दिला असेल तर मारु नका, नसेल दिला तर त्यांना जरुर मारा. त्यांनी विधानपरिषदेच्या शपथपत्रात दोन बायका असल्याचं लिहून दिलं आहे”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
नाशिकमध्ये ठाकरे गटातील (Thackeray Group) शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या कामावर अनेक पक्षातील लोक खुश आहेत. एकनाथ शिंदे गतिमान सरकार चालवत आहेत. जनतेचा मुख्यमंत्री म्हणून सहज उपलब्ध असलेले अशी त्यांची ओळख आहे. त्यावर विश्वास ठेवून राज्यभरातील अनेक पक्षातील लोक येण्यास तयार आहेत. भविष्यात राजकीय परिवर्तनासाठी अनेक लोक शिंदे गटात येतील”, असा विश्वासही अब्दुल सत्तारांनी व्यक्त केला.