अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा; म्हणाले, “5वी पासूनच विद्यार्थ्यांना देणार…”

मुंबई | Abdul Sattar’s Announcement – कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. दरम्यान, आता अब्दुल सत्तार यांनी शिक्षकांनाही शेतीचं प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा केली आहे. तसंच पाचवीपासून विद्यार्थ्यांना शेतीचे धडे देणार असल्याचंही सत्तार यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना यासंदर्भात माहिती दिली आहे. शेतात तरुणांना निपुन करण्याच्या उद्देशाने हे धोरण राबवण्यात येणार आहे. शेतीतले अनेक छोटे मोठे प्रकार असतात. गायींना चारा कसा द्यायचा अशा अनेक गोष्टी असतात. या सर्वांचे प्रशिक्षण लहानपणापासून विद्यार्थ्यांना दिले तर याचे परिणाम भविष्यात चांगले असू शकतात. नोकरी नाही मिळाली तर त्यांना शेतीदेखील करता येत नाही. जर त्यांना लहानपणापासून शेती कशी करावी याचे जर शिक्षकांना प्रशिक्षण दिले तर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. यामध्ये नांगर धरण्यापासून अधुनिक शेतीचं प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे.

शिक्षकांना शेतीचे ट्रेनिंग देण्याची जी रचना आहे हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालू. त्यांना हा निर्णय पटला तर ते शिक्षणमंत्र्यांना आदेश देतील. असं सत्तार यावेळी म्हणाले. तसंच, याचा खर्च कृषी मंत्रालयाने द्यायचा की शिक्षणमंत्रलयाने याची बैठक होईल. अशी माहिती देखील सत्तार यांनी यावेळी दिली.

Sumitra nalawade: