‘हा’ स्पर्धक ठरला Bigg Boss OTT 2 चा पहिला फायनलिस्ट, फॅन्स झाले खुश

मुंबई | Bigg Boss OTT 2 Finalist – सध्या Bigg Boss OTT चा दुसरा सीझन चांगलाच गाजताना दिसत आहे. या सीझनला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. कधी वादविवाद, भांडण तर कधी प्रेम अशा अनेक गोष्टींमुळे बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व चांगलंच गाजतंय. या पर्वातील स्पर्धकांनी देखील त्यांच्या उत्कृष्ट खेळीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच आता बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा पहिला फायनलिस्ट समोर आला आहे.

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाला त्यांचा पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. हा फायनलिस्ट दुसरा तिसरा कोणी नसून सर्वांचा आवडता अभिषेक मल्हान (Abhishek Malhan) आहे, जो फुकरा इंन्सान या नावानं प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे अभिषेक मल्हान हा बिग बॉस ओटीटी 2 चा शेवटचा कॅप्टन ठरला असून सोबतच तो पहिला फायनलिस्टही ठरला आहे. त्यामुळे आता अभिषेकच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्यांच्या आवडीच्या एका स्पर्धकाला स्टार द्यायचा होता. घरातील ज्या दोन स्पर्धकांना जास्तीत जास्त स्टार्स मिळतील त्यांच्यामध्ये एक टास्क होणार होता. हा टास्क जो जिंकेल तो घराचा शेवटचा कॅप्टन आणि पहिला फायनलिस्ट होणार होता. तर या टास्कमध्ये अभिषेक जिंकला आणि तो बिग बॉस ओटीटी 2 चा पहिला फायनलिस्ट ठरला आहे.

admin: