पुणे : पूण एमहापालिकेची सूत्रे सध्या आयुक्तांच्या हातात आहेत, त्यामुळं अतिक्रमण विभागाच्य कारवायांना वेग आल्याचं दिसत आहे. पुण्यातील रहदारीचा असलेल्या डीपी रस्त्यावर आज महापालिकेनं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे या रस्त्यावर मोठे हॉटेल्स, लॉन्स, अनेक छोटे मोठे सभागृह, तसेच अनेक मंगल कार्यालय देखील आहेत. लगीनसराईत त्यांचं बुकिंगही फुल्ल आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते.
कारवाई करण्यात आलेल्या दुकानदारांनी सांगितले की त्यांना २४ तासांपूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र अनेक दुकानमालांचं मोठया प्रमाण नुकसान झालं आहे. आज पहाटेच पाच वाजल्यापासून अतिक्रमण विभागाकडून dp रोड भागात कारवाई सुरु करण्यात आली. यासाठी तब्बल १५ जेसिबी कामाला लावण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.