मुंबई : आज सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकरणात एकच खळबळ उडाली आहे. त्याचं कारण ठरलं आहे ते, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात पुकारलेलं बंड. त्यानंतर आता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्याचा अंतिम निर्णय समोर येणार आहे. तर फडणवीस हे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार का?
दरम्यान, गुजरात भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३५ आमदार असल्याची माहिती देण्यात आली. तर, शिंदे आमच्या संपर्कात असल्याची माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. तर १२ वाजता एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद गुजरातमधील सुरत येथिल हाॅटेलमध्ये होणार आहे.
एकुणचं मिळालेल्या माहितीनुसार, भाजपनं एकनाथ शिंदे यांना मोठी ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. शिंदे यांच्यासोबत एकूण ३५ आमदार असून, अनेक मंत्री देखील आहेत.