ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. नोएडाहून परी चौकाकडे जात असताना हा अपघात झाला.
हे प्रकरण ग्रेटर नोएडा नॉलेज पार्क पोलीस स्टेशन परिसरातील आहे. परी चौकाकडे जाणारी कार ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर मागून उभ्या असलेल्या ट्रकला धडकली आणि या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढले, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले.
या अपघाताबाबत एडीसीपी ग्रेटर नोएडा अशोक कुमार यांनी सांगितले की, १० नोव्हेंबर (रविवार) सकाळी नॉलेज पार्क पोलिस स्टेशनच्या सेक्टर १४६ जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एका वॅगोनियर कारने मागून खराब पार्क केलेल्या ट्रकला धडक दिली. ज्यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आणि इतर चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
एडीसीपी ग्रेटर नोएडा यांनी सांगितले की, पोलिसांकडून शवविच्छेदन केले जात असून कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. नुकसान झालेली वाहने महामार्गावरून हटवण्यात आली असून वाहतूक सुरळीत सुरू आहे.