पुणे : नारायणगावच्या हद्दीत सकाळी साडेदहाच्या सुमारास वारूळवाडी – मांजरवाडी रस्त्यावर एका कंटेनरची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील दोन भावांचा मृत्य झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला दसून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेले रामदास दशरथ केदारी (वय ४२), नारायण दशरथ केदारी दिघे आदिवासी कुटुंबातील वारूळवाडी येथील आहेत. तर त्यांचा सहकारी पोपट होनाजी काळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.