“व्हिपचे उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई” मुख्यमंत्र्यांचा सेनेला इशारा!

मुंबई : (CM Eknath Shinde On Shivsena MLA) दोन दिवसीय विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे सरकार उरलेले अडीच वर्षांचा कार्यकाळ शंभर टक्के पूर्ण करणार आहे. यापेक्षा जास्त काही बोलत नाही. पुढचं आताच सांगत नाही. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, महाविकास आघाडीला शंभरीही गाठता आली नाही. शिंदे आणि भाजप सरकारला १६४ तर मविआला ९९ मते मिळाली. आज दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. आज एक आमदार आमच्या बाजूने आला. यामुळे आमची संख्या वाढली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आमच्याकडे शिवसेनेचे एकूण ४० आमदार झाले आहे. ही संख्या आणखी वाढणार आहे. यामुळे खरी शिवसेना आमची आहे. तेव्हा व्हिपचे उल्लंघन करून विरोधात मतदान करणाऱ्या आमदारांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

Prakash Harale: