प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा अपघात, स्वत:च दिली माहिती; म्हणाला, “ट्रकने जोरात धडक दिली अन्…”

मुंबई | Akash Choudhary – ‘भाग्यलक्ष्मी’ फेम प्रसिद्ध अभिनेता आकाश चौधरीचा (Akash Choudhary) मोठा अपघात (Accident) झाला आहे. लोणावळ्याला जात असताना त्याच्या कारला एका ट्रकने जोरात धडक दिली. सुदैवाने या अपघातात आकाशला आणि त्याच्या सोबत असलेल्या त्याचा पाळीव श्वान हेजलला कोणतीही दुखापत झालेली नाही. यासंदर्भातली माहिती स्वत: आकाशने दिली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना आकाश चौधरी म्हणाला की, “ज्यावेळी ट्रकने माझ्या कारला धडक दिली त्यावेळी मला नेमकं काय घडलं ते कळलंच नाही. मात्र, सुदैवाने या अपघातात मला आणि हेजलला कोणतीही दुखापत झालेली नाही. पण या अपघातानं मला हादरवून सोडलं आहे. मला रात्रभर झोप नाहीये, या अपघातात रस्त्यावर काय घडलं असतं हा विचार करूनच मी घाबरलो होतो. मला आयुष्य हे किती नाजूक आणि अस्थिर असू शकतं याची जाणीव झाली. तसंच आम्हाला सुरक्षित ठेवल्याबद्दल मी देवाचा मनापासून आभारी आहे.”

“देवराज पटेल आणि वैभवी उपाध्याय यांचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर मी रस्त्यावर गाडी चालवत असताना खूप घाबरलो होतो. तसंच पोलिसांनी माझ्या कारला धडक दिलेल्या ट्रक चालकाला अटक केली होती. पण मी तो गरीब माणूस असल्यामुळे माझी तक्रार मागे घेतली”, असंही आकाशने सांगितलं.

दरम्यान, आकाश चौधरी हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तो ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आला आहे. तसंच तो ‘स्प्लिट्सवीला’ या रिएॅलिटी शोमध्येही झळकला होता.

admin: