सिनेसृष्टीवर शोककळा! मराठी अभिनेते पराग बेडेकर काळाच्या पडद्याआड

मुंबई | Parag Bedekar – मराठमोळे अभिनेते आणि दिग्दर्शक पराग बेडेकर (Parag Bedekar) यांचं निधन झालं आहे. ते 48 वर्षांचे होते. झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं आहे. पराग बेडेकर यांनी मराठी मालिका आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. तसंच त्यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

पराग बेडेकर यांचा ठाणे (Thane) शहराला सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. त्यांनी कॉलेजमध्ये असताना एकांकिकांच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. मी नथुराम गोडसे बोलतोय, यदा कदाचित, पोपटपंची, सारे प्रवासी घडीचे, लाली लीला अशा अनेक नाटकांत पराग यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

पराग यांनी ‘कुंकू’, ‘चारचौघी’, ‘एक झुंझ वादळाशी’, ‘ओढ लावावी जिवा’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. त्यांनी अनेक नाट्य स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. तसंच त्यांच्या निधनानं मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Sumitra nalawade: