अभिनेता प्रसाद ओकचं “माझा आनंद” पुस्तक वाचकांच्या भेटीला

मुंबई | Prasad Oak – मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एकापाठोपाठ एक जबरदस्त असे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर परिवर्तन घडवून आणणारे काही चित्रपट पाहायला मिळतात. तर काही मनोरंजनाच्या पलीकडे प्रेक्षकांसाठी आणि अभिनेत्यासाठी तो एक चित्रपट अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. तसंच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट. हा चित्रपट लोकनेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित होता. तसंच आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली असून अभिनय कौशल्याची आणि मेहनतीची दखल सर्व रसिक प्रेक्षक आणि सिनेजाणकारांनी आवर्जून घेतली आहे. प्रसादने त्याच्या या अभिनयाबद्दलचे अनुभव एका पुस्तकात मांडले असून त्याचे नाव ‘माझा आनंद’ असं आहे. माझा आनंद’ हे पुस्तक लवकरच वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. याचप्रमाणे एक अभिनेता म्हणून प्रसादचा ‘धर्मवीर आनंद दिघे’ या भूमिकेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आता सर्वांना जाणून घेतला आहेच परंतु आता वाचता देखील येणार आहे. कारण, या भूमिकेसाठी प्रसादने केलेली मेहनत याबाबत त्याने या पुस्तक लिहिलं आहे. हा पुस्तकरुपी दस्तऐवज नवीन कलाकारांना भूमिका साकारत असताना काय करायला हवं याबाबत मार्गदर्शन करेल; असं प्रसादच मत आहे.

प्रसाद ओक म्हणतो की,”माझं सिनेमांसाठी ऑडिशन होत असताना मला जाणवत होतं की, हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे. याबाबत लिहावं असं मला वाटतं होतं. पण, माझं लिखाण चांगलं नाही याची मला कल्पना होती. मी लिहिलेलं एक नाटक मला मुळीच आवडलं नव्हतं. त्यामुळे लिखाणाकडे मी कानाडोळा केला. पण जसजसा सिनेमा घडत होतो; तसं मला येणाऱ्या अनुभवांची नोंद झाली पाहिजे असं प्रकर्षानं जाणवू लागलं. माझी पत्नी मंजिरी मला सतत पुस्तक लिहिण्यासाठी आग्रह करत होती; पण मी याबाबत अजिबात विचार करतो नव्हती परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मी, मंजिरी आणि समीर चौघुले बोलत बसलो असताना मी माझ्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल फार पोटतिडकीनं त्यांना सांगत होतो त्यावेळी पुन्हा पुस्तक लिहिण्याचा विषय आला. यावेळी मी ठरवलं पुस्तक लिहिण्याचचं. याचप्रमाणे वयाच्या 45व्या वर्षी एका कलाकाराला त्याचा असा स्वतंत्र सिनेमा, भूमिका गवसते. ती भूमिका साकारताना आलेला अनुभव, त्याविषयीची तयारी, भूमिकेमागील त्या कलाकाराचा प्रवास हे या पुस्तकात लिहलं असल्याचे प्रसादने सांगितलं आहे”.

दरम्यान, हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशन करणार आहे. तर पुस्तकाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिली आहे. ‘या पुस्तकाला कोणत्याही राजकारणाचा गंध नाही. केवळ एका कलाकाराच्या त्याच्या भूमिका साकारतानाच्या प्रवासावर हे पुस्तक आहे’, असंही प्रसाद सांगतो. तसंच यामध्ये मनोरंजनसृष्टीतील काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया संकलित करण्यात आल्या आहेत. तसंच प्रज्ञा पोवळेनं या पुस्तकाचं शब्दांकन केलं आहे.

Sumitra nalawade: