अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत सयाची शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. सयाजी शिंदे यांचं सामाजिक क्षेत्रात चांगल काम आहे. त्यामुळे आम्ही आज आमच्या सोबत त्यांना घेत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रवेशावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. 

सयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील

अजित पवार म्हणाले, मी तेच म्हणतोय उभं नका करू उभं नका करू तरीदेखील मला उभं करतात. सयाजी शिंदे यांना झाडांची आवड आहे. सह्याद्री देवराई साठी चांगल काम करत आहेत. सिद्धिविनायक आणि दगडूशेठला सर्वजण जात असतात. साईबाबाला जातात. तिथं प्रसाद म्हणून रोपट दिलं तर देवाचा प्रसाद म्हणून ते चांगल वाढवल जाईल. सयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. 

पाचशे सहाशे फिल्म केल्या आहेत. त्यामुळे आता काही अडचण नाही

आता काय हटायच नाही जे व्हायच ते होऊ देत त्यामुळे प्रवेश करत आहे. पाचशे सहाशे फिल्म केल्या आहेत. त्यामुळे आता काही अडचण नाही. त्यामुळे राजकारणात येऊन काही मिळवायच नाही. चांगल काम करायचं आहे. त्यामुळे प्रवेश करत आहे. पुढच्या पाच वर्षात चांगलं काम करणार आहे, असं सयाजी शिंदे यांनी सांगितलं. 

Rashtra Sanchar: