अभिनेत्री स्वरा भास्करने केलं कन्हैया कुमारचं कौतुक म्हणाली…

मुंबई : ईडीकडून राहुल गांधींना चौकशीसाठी बोलवल्याने काँग्रेस पक्षाकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. या दरम्यान काँग्रेस नेते कन्हैय्या कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांत टीका केली आहे. कन्हैय्याने ‘अग्निपथ योजना’ चुकीची असल्याचं म्हटलं आहे. तसंच या सत्याग्रहाप्रसंगी भाषण देताना कन्हैय्या कुमारचा व्हिडिओ शेअर करत बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने त्याचं कौतुक केलं आहे.

स्वरा भास्करने कन्हैया कुमारचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, कन्हैया कुमार आज फॉर्ममध्ये आहे. मतभेद, योद्धा, चांगल्या प्रकारे तयारी हे ऐकायला फार मजा आली. तसंच स्वराला नेहमी ट्रोल केले जात असते. आता कन्हैय्या कुमारने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे समर्थन केल्यावर तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

चाचा मोंक नावाच्या यूजरने लिहिलं आहे की, भाषण तर हे चांगले करतात. मात्र पुन्हा निवडणुकीत त्याची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर राहुल नावाच्या यूजरने लिहिले, कोणालाही हा काय बोलतो याने फरक पडत नाही. दिवा जेव्हा मावळायला येतो तेव्हा तो जास्त फडफडतो. एवढीशी गोष्टही तुम्हाला कळत नाही. जीवनात कधी तरी चांगले काम करा, असा सल्ला वैभव यांनी स्वरा भास्करला दिला आहे.

RashtraSanchar: