छत्रपती संभाजीनगरात आदर्श ठेवीदारांचा मोर्चा; इम्तियाज जलील यांचाही समावेश, मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये झटापट

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhaji Nagar – आज (16 सप्टेंबर) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून या बैठकील सुरूवात झाली आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांकडून मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे देखील सहभागी झाले आहेत.

मंत्र्यांनी येऊन मोर्चेकऱ्यांशी संवाद साधावा अन्यथा आम्ही मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेऊ, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केली. यावेळी मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग पाहायला मिळाला. तसंच यादरम्यान पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये झटापटही झाली.

यावेळी इम्तियाज जलील म्हणाले की, संचालक मंडळाच्या आणि आदर्श नागरी पतसंस्थेच्या मालमत्तेचे निलामी करून शेतकरी, गोरगरीब ठेवीदारांचे पैसे देण्यात यावे. तसंच आत्महत्या केलेल्या ठेवीदारांच्या नातेवाईकांना पाच लाखांची तात्काळ मदत करण्यात यावी. शासनानं रूग्णालयात भरती ठेवीदारांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च करावा, अशी मागणी जलील यांनी आंदोलनादरम्यान केली

Sumitra nalawade: