मुंबई | Rakhi Sawant – गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड (Bollywood) अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. राखीनं तिचा पती आदिल खानवर (Adil Khan) फसवणूक व मारहाण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तसंच तिनं आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर आदिलवर म्हैसूरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता त्याची म्हैसूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तर याप्रकरणात राखीकडून रोज नवनवे खुलासे होत आहेत. आताही राखीनं एक धक्कादायक खुलासा केला आहे.
नुकताच राखीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीनं आदिलबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. “आदिलच्या डोक्यावर केस नाहीत, हे मला माहीत नव्हतं. तो टकला असल्याची माहिती मला हेअर अॅण्ड स्कीन फॅक्टरीकडून मिळाली आहे. हे ऐकून मला मोठा धक्का बसला आहे. तसंच तो बायसेक्शुअल आहे, हे देखील मला आत्ताच समजलंय. मी त्याचा एक न्यूड व्हिडीओही काही दिवसांपूर्वी पाहिला. खूप घाणेरडा व्हिडीओ होता तो”, असं राखी म्हणाली. तसंच राखीच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, राखी आता शूटिंगमध्ये व्यग्र झाली आहे. लवकरच ती एका नवीन गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तिच्या नवीन गाण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.