मुंबई | ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आदिपुरुष या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हिंदीसोबतच तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये देखील हे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. जय श्रीराम या गाण्याचं हे लिरिकल मोशन पोस्टर आहे. या मोशन पोस्टरमध्ये प्रभासच्या (Prabhas) हातात धनुष्यबाण दिसत आहे. प्रभासच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सतत वादात सापडणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर पाहून नेटकऱ्यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. रामाणय या पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेता प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी ‘आदिपुरुष’चा लिरिकल मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. काही सेकंदांच्या या व्हिडीओने चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. प्रभासचा हा नवीन मोशन पोस्टर चाहत्यांना खूपच आवडला आहे.
‘तेरे ही भरोसे हैं हम, तेरे ही सहारे। दुविधा की घड़ी में ये मन तुझको ही पुकारे। तेरे ही बल से है बल हमारा, तू ही करेगा, मंगल हमारा। मंत्रों से बढ़के तेरा नाम, जय श्री राम राजा राम’, या ओळी व्हिडीओत ऐकायला मिळत आहेत. या ओळींसोबतच प्रभासचा राम अवतार या मोशन पोस्टरमध्ये दिसू लागतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
‘आदिपुरुष’ कधी प्रदर्शित होणार ?
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरवरून बरेच वाद निर्माण झाले आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने व्हिएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.