आदिपुरुष चित्रपटातील ‘जय श्रीराम’ गाण्याचं मोशन पोस्टर रिलीज; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

Adipurush | अभिनेता प्रभासचा (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाची जेव्हापासून घोषणा झाली त्या दिवसापासूनच सतत चर्चेत आहे. सिनेमाचं टीझर जेव्हा प्रदर्शित करण्यात आलं होतं तेव्हा प्रचंड मोठा गदारोळ उठलेला. सिनेमाला होणारा विरोध पाहून निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही पाच महिन्यांनी पुढे ढकलली होती. चर्चेत असलेल्या आदिपुरुष चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आज अक्षय्य तृतीयेला दिग्दर्शक ओम राऊतच्या (Om Raut) आदिपुरुष या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर नुकतच रिलीज करण्यात आलं आहे. जय श्रीराम या गाण्याचं हे लिरिकल मोशन पोस्टर आहे.

आदिपुरुष या चित्रपटाचं जय श्रीराम हे लिरिकल मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हिंदीसोबतच तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये देखील हे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. प्रभासनं हे लिरिकल मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. हे पोस्टर शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जब न जा पाओ सारे धाम, तो बस ले लो प्रभु का नाम,जय श्रीराम’ प्रभासनं शेअर केलेल्या या मोशन पोस्टरमध्ये प्रभासच्या हातात धनुष्यबाण दिसत आहे. प्रभासच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

आदिपुरुष कधी होणार रिलीज?

प्रभासचा ‘आदिपुरुष’ आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आदिपुरुष हा चित्रपट आता 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ट्रायबेका फेस्टिव्हलमध्ये आदिपुरुष या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमिअर होणार आहे. हा प्रिमिअर 13 जून 2023 रोजी होणार आहे.

Dnyaneshwar: