Aditya L-1 | आदित्य L-1नं (Aditya L-1) सूर्याच्या दिशेनं पुढचं पाऊल टाकलं आहे. आदित्य एल-1 अंतराळयानानं चौथी प्रदक्षिणा ‘फोर्थ अर्थ बाउंड मॅन्युव्हर’ यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ‘अर्थ बाउंड मॅन्युव्हर’ म्हणजे पृथ्वीभोवती फिरत असताना गुरूत्वाकर्षण शक्तीद्वारे अंतराळात प्रवास करण्यासाठी गती निर्माण करणे. तर याबाबतची माहिती इस्त्रोनं (ISRO) ट्विटद्वारे दिली आहे.
इस्त्रोनं ट्विट करत म्हटलं आहे की, ‘फोर्थ अर्थ बाउंड मॅन्युव्हर’ (EBN#4) यशस्वी झाला आहे. या उपग्रहाचा मागोवा इस्त्रोच्या मॉरिशस, श्रीहरिकोटा, बेंगळुरू येथील सतीश धवन स्पेस सेंटर आणि पोर्ट ब्लेअरमधील ग्राउंड स्टेशनच्या माध्यमातून घेण्यात आला होता. आदित्य एल-1 साठी फिजी बेटावरील वाहतूक करण्यायोग्य टर्मिनल अवकाशयानाला पोस्ट-बर्न ऑपरेशनमध्ये मदत करणार आहे. 256 किमी x 121973 किमी अंतरावर आदित्य एल-1 अंतराळयान आहे.
तर भारतीय अंतराळ एजन्सीनं म्हटलं आहे की, 19 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता पुढील मॅन्युअर ट्रान्स-लॅग्रेजियन पॉइंट 1 इन्सर्शन (TLAI) केली जाणार आहे.