ठाकरे कुटुबांला आणखी एक धक्का! आदित्य ठाकरेंची आमदारकीही जाणार?

मुंबई :  मागील काही दिवसांपासून राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या. सत्तेत असणारे पायउतार झाले आणि विरोधातले सत्तेत आले. शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आणि हे सर्व सत्तानाट्य घडले. त्यानंतर विधानसभेत सोमवारी दि. ४ एकनाथ शिंदे गटानं आणि भाजपच्या मदतीनं बहुमत सिद्ध केलं.

दरम्यान, यावेळी सरकारला १६४ मते पडली तर केवळ ९९ मते विरोधात पडली. एकनाथ शिंदे सरकारच्या विरोधात पडलेले एक मत आदित्य ठाकरे यांचं आहे. त्यांना आता अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वतीने एकनाथ शिंदे गटाने भरत गोगावले यांना शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली.

त्यानंतर गोगावले ज्यांच्या वतीने एकनाथ शिंदे सरकारच्या समर्थनार्थ मतदान करण्यासाठी व्हिप जारी केला होता. मात्र, आदित्य ठाकरे यांनी व्हिपचे पालन केलं नसल्यानं त्यांच्यावर शिंदे गटाकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Prakash Harale: