आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ; शिवसेनेमागचं विघ्न सरता सरेना?

मुंबई : (Aditya Thackeray on Aarey car shed) आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करावा यासाठी रविवारी दि. १० रोजी काही पर्यावरणप्रेमी संस्थांकडून आंदोलन केलं. या आंदोलनात राज्याचे माजी पर्यावरण मंत्री व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झाले. अदित्य ठाकरेंनी या आंदोलनाचे फोटो आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केले आहेत. त्यांनी ट्विट केलेल्या फोटोत काही लहान मुलांच्या गळ्यात आरे वाचवाच्या पाट्या लावून त्यांना आंदोलनात सहभागी केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, या पार्श्वभुमीवर आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरून सुरु असलेल्या आंदोलनाला आता वेगळं वळण लागलं आहे. आंदोलनात लहान मुलांचा वापर झाल्याप्रकरणी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री व युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सह्याद्री राईट्स फोरम या संस्थेने राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे तक्रार केली आहे.  

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त, राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मेल पाठवत कारवाई करण्याची  मागणी केली आहे. सह्याद्री राईट्स फोरमने पुरावा म्हणून आदित्य ठाकरे यांचं ट्विट मेलमध्ये टाकले आहे. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटमध्ये लहान मुलं आंदोलनात सहभागी असल्याचं दिसत आहे. यामुळं बाल नाय हक्क संरक्षण कायदा 2015 चे उल्लंघन केलं असल्याचा त्यांच्यावर आरोप घेण्यात आला आहे. त्यामुळं त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सह्याद्री राईट्स फोरमच्या वतीनं करण्यात आली आहे. 

Prakash Harale: