कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचं नागरिकांना आवाहन

मुंबई : आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण दिनानिम्मित माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी सध्या राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी पुन्हा मास्क वापरण्याची वेळ आली असल्याचंही सांगितल आहे. तसचं त्यांनी कोरोना प्रोटोकॉल बदलही मत व्यक्त केलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्आयामुळे सर्ताव नागरिकांनी पुन्हा मास्क वापरायला सुरवात करावी असं आवाहनकेलं आहे. तसचं घराच्या बाहेर पडताना प्रत्येकाने खबरदारी घावी. त्याचबरोबर घाबरायचं काही कारण नाही, फक्त सूचनांचे पालन करा, रुग्ण वाढत असले तरी चिंताजनक परिस्थिती आजून झाली नाही. मात्र, सर्वांनी मास्क वापला पाहिजे असं आदित्य ठाकरे यांनी सांगितल आहे.  

दरम्यान, माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,  “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने” मार्गदर्शक तत्त्वे जारी करेपर्यंत आम्ही थांबलो आहोत. जोपर्यंत केंद्र सरकार नियमावली जरी करत नाही तोपर्यंत आम्ही कोणतेच प्रोटोकॉल लावणार नसल्याचंही ते म्हणाले. तसच राज्यात गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात पटीने वाढली असल्यामुळे खबरदारी घेतली पाहिजे. चौथी लाटच सुरु झाली असल्याचं आपण समजूया आणि मास्क वापरूया असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Nilam: