मुंबई | Aditya Thackeray’s First Reaction On Tejas Thackeray’s Politics Entry – सध्या दसरा मेळाव्यावरून शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेनेत (Shivsena) चांगलाच वाद सुरू आहे. तसंच मुंबई मनपाने अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) परवानगी दिलेली नाही. अशात हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या दरम्यान, दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे (Tejas Thackeray) राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र. या संदर्भात आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी एक पोस्टर प्रकाशित करण्यात आलं आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंसोबत तेजस ठाकरे यांचा फोटो आहे. त्यामुळे तेजस ठाकरे राजकारणात येणार अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “तेजस ठाकरे हे राजकारणात येणार नसून यासंदर्भातील बातम्या खोट्या आहेत. यावर कोणीही विश्वास ठेऊ नये. तेजस ठाकरे हे सद्या त्यांच्या वाईल्ड लाईफच्या कामात व्यस्त आहेत”, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.