मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर चार आरोपींचा जामीन फेटाळला आहे. यामध्ये सचितानंद पुरी, राम कातकडे, संकेत नेहरकर आणि रमेश गोरे यांचा समावेश आहे. या हल्ल्याप्रकरणातील सर्व म्हणजे 115 आरोपी सोमवारी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.
आरोपी संदीप गोडबोले आणि अजित मगरे यांना 19 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच या चार आरोपींपैकी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी या हल्ल्यामध्ये सदावर्तेंचा हात असल्याचं कबुल केलं आहे.