नवी दिल्ली | Yasin Malik Shahid Afridi | काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिकला (Yasin Malik) दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनाआयए कोर्टानं दोषी ठरवलं आहे. त्यासंदर्भात आता पाकिस्तानने तीव्र संताप व्यक्त केला आहे. एनआयएच्या या निर्णयाविरोधात पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने ट्विट केलं आहे.
शाहिद आफ्रिदी भारत पाकिस्तानचा कोणताही मुद्दा असो त्यावर नेहमी भाष्य करत असतो. तसंच आत्ताही त्याने यासिन मलिकच्या बाजूने एक ट्विट केलं आहे. शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भारताकडून मानवाधिकारांचे हणन केलं जात आहे, या विरोधात आपण संयुक्त राष्ट्रामध्ये धाव घेणार आहे. जम्मू काश्मिरच्या (Jammu Kashmir) स्वातंत्र्यासाठी यासिन मलिक काम करत होता आणि त्याला दोषी ठरवलं आहे. भारताने या प्रकरणी मानवाधिकारांचे उल्लंघन केलं आहे. संयुक्त राष्ट्राने (UN) या प्रकरणात आता हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.”
दरम्यान, दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी काश्मिरचा फुटिरतावदी नेता यासिन मलिकला एनआयए कोर्टानं दोषी ठरवलं आहे. तसंच यासिन मलिकने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनाआयए विशेष कोर्टानं १९ मे रोजी त्याला दोषी ठरवले होते. त्याचबरोबर आज एनआयए कोर्टात शिक्षेवर सुनावणी झाली. एनआयएने यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.