पिंपरी चिंचवड –(Chandrakant Patil News) चंद्रकांत पाटील यांनी काल महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी भिक मागून शाळा सुरु केल्या असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याने राज्यभरातून त्यांच्या कीरोधात संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. आज त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. (Chandrakant Patil In Pimpri Chinchawad)
या घटनेनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सगळे कार्यक्रम करणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे कुणालाही मी घाबरत नाही. माझ्या वक्तव्याचं तीन-तीन वेळा स्पष्टीकरण दिल्यानंतरही, दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही हा भ्याडपणा करणात आला आहे. अरे हिम्मत असेल तर समोर या चला. सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला बाजूला करू. अशी आक्रमक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
“अरे काय चाललंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचा विरोध हा लोकशाही मार्गाने करायचा हे शिकवलं. पण ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही, या शाईफेकीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली सुटदिली असती तर त्यांना खूप महागात पडलं असतं.” असही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.