‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत ‘टीडीएम’ चित्रपटातील गाण्यांकडे रसिकांच्या नजरा

TDM Movie : ‘टीडीएम’ चित्रपटाच्या पोस्टरने (TDM Movie Poster Release) रसिक प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली होती कारण चित्रपटात कोणता कलाकार भूमिका साकारणार हे गुपित ठेवण्यात आले होते. आता मात्र या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे (Bhaurao Nanasaheb Karhade) यांनी त्यांच्या नजरेने कैद केलेले दोन नवोदित चेहरे चित्रपटात अभिनयाची जादू दाखवायला सज्ज झाले आहेत. चित्रपटात अभिनेता पृथ्वीराज (Pruthwiraj) आणि अभिनेत्री कालींदी (Kalindi) ही नवोदित जोडगोळी प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घ्यायला तयार झाली आहे. यासह चित्रपटातील गाण्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या दिलावर राज्य केले आहे. सोशल मिडीयावर वाऱ्यासारख पसरलेल हे ‘एक फुल’ (Ek Phool) गाणं ‘व्हॅलेंटाईन डे’चे (Valentine Day) औचित्य साधत प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका नक्कीच चुकवेल यांत शंका नाही. (TDM Marathi Movie Comming Soon)

वास्तविकतेचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाला रोमान्सची जोड आहे हे गाण्यांवरून स्पष्ट होतंय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे ‘ख्वाडा’ (Khwada Marathi Movie) आणि ‘बबन’ (Baban Marathi Movie) चित्रपटाच्या यशानंतर ‘टीडीएम’ (TDM Marathi Movie) चित्रपटातून नव्यानं प्रेक्षकांच्या समोर एक आगळावेगळा विषय घेऊन येत आहेत. ‘टीडीएम’ मध्ये पृथ्वीराज आणि कालींदीचा रोमँटिक अंदाज पाहणं रंजक ठरणार आहे. शिरूर येथे झालेल्या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला ही नवोदित जोडगोळी पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आली, आणि ते चित्रपटातील ‘एक फुल’ या गाण्यावर थिरकताच त्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत निर्मितीचीही धुरा भाऊरावांनी पेलवली आहे. ‘चित्राक्ष फिल्म्स’ (Chitraksh Films) आणि ‘स्माईल स्टोन स्टुडिओ’ (Smile Stone Studio) प्रस्तुत तर निर्माते भाऊराव कऱ्हाडे निर्मित ‘टीडीएम’ हा दर्जेदार विषय २८ एप्रिल २०२३ ला प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. तत्पूर्वी चित्रपटातील गाणीच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत त्यांना चित्रपट पाहण्यास भाग पाडतील, हे ही खरंच.

‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली असून चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी पाहिली. तर चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडे यांच्या सुमधुर आवाजात सुरबद्ध केले आहे. २८ एप्रिल २०२३ ला हा सिनेमा मोठया पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.

Dnyaneshwar: