“‘ही’ निवडणूक झाल्यावर राज्यातील सरकार मोदी बरखास्त करतील”

सांगली – Suresh Halvankar on BJP | राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाल्यानंतर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करतील, असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर (Suresh Halvankar) यांनी केला आहे. सांगलीमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे न बोलता कार्यक्रम करण्यात पटाईत आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कार्यक्रम पक्का होता. केवळ मुख्यमंत्रिपदासाठीच जनादेश डावलून तीन पक्ष एकत्र आले आहेत. ठाकरेंनी दगाबाजी केली आहे. त्याचा फटका त्यांना राज्यसभा निवडणुकीत दिला असल्याचं हाळवणकर म्हणाले.

दरम्यान, 2024 मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मावळे कावळे होऊन उडून गेले असतील. भाजप हा सर्वात मोठा पक्ष होऊन स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करेल, असंही हाळवणकर यांनी म्हटलं आहे.

RashtraSanchar: