यासिन मलिकला जन्मठेप झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींनी केलं ‘हे’ खास ट्विट, म्हणाले…

मुंबई | Vivek Agnihotri On Yasin Malik | दहशतवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा केल्याप्रकरणी काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिकला (Yasin Malik) दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच न्यायालयाने मलिक याला दहा लाखांचा दंडही ठोठावला आहे. यासिन मलिकला बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यासह अन्य गुन्ह्यांत न्यायालयाने १९ मे रोजी दोषी ठरवले होते. यासिनला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) (NIA) वकिलांनी केली होती़. या निकालानंतर श्रीनगरमधील (Shrinagar) काही नाकेबंदी करण्यात आली आहे. या निर्णयाचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी कौतुक केलं आहे. Vivek Agnihotri On Yasin Malik |

यासिन मलिकला दिल्लीतील न्यायालयानं बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाचे दिग्दर्शक (Director) विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट (Tweet) केलं आहे. सोबतच त्यांनी या निर्णयाचं स्वागत देखील केलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “ही फक्त सुरवात आहे. जोपर्यंत यासिन मलिक आणि बिट्टाला फोशी होत नाही तोपर्यंत आम्ही न्याय हक्कासाठी आमचा लढा थांबवणार नाही.”

तसंच फार उत्तम निर्णय. “हा सर्व काश्मिरी हिंदूंसाठी आनंदाचा क्षण आहे. न्याय हक्कासाठी आमच्या मोहिमेतील एक मैलाचा दगड आहे.” असंही विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे. त्यासोबत त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

Sumitra nalawade: