पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक..
पोलिसांकडून अधिकृत हिरवा कंदील मिळाला की, घरमालकांकरिता स्थानिक पोलीस ठाण्यात भाडेकरूचे व्हेरिफिकेशन बंधनकारक आहे. ते न केल्यास इंडियन पिनल कोडमधील कलम १८८ नुसार हा शिक्षेस पात्र गुन्हा ठरू शकतो. घरमालकांना पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्ममध्ये भाडेकरूचा तपशील भरायचा असतो. या फॉर्मसोबत भाडेकरूचा फोटो व कागदपत्रे म्हणजेच पॅनकार्ड, भाडेकरार आणि पत्त्याचा पुरावा – प्रत स्थानिक पोलीस ठाण्यात द्यायची असते. यामुळे भाडेकरू गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची शक्यता कमी होते.
बाणेर येथे अनेक ठिकाणी रिकाम्या जागा मालकांनी पत्र्याचे शेड उभारून घरे व दूकाने भाड्याने दिले आहे. याकरिता साध्या स्टॅप पेपरवर व्यवहार करून जागा भाड्याने देतात. अनेक मजूर भाड्याने घरे घेऊन राहतात किराणा दूकानदार, पानटपरी, भंगार व्यावसायिक हे बिहार, राजस्थान, बंगाल परराज्यातून येतात. घर सहज मिळत असल्यामूळे ते येथे सर्रासपणे वास्तव्य करतात, मात्र काही गून्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहतात यावर वेळीच बंधन घालणे आवश्यक आहे.
गोविंद कोरडे, सामाजिक कार्यकता, बाणेर
औंध : घर भाड्याने देण्याआधीच योग्य ती काळजी नक्की घ्यायला हवी. भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिल्यास वा अन्य काही फसवणूक केल्यास काय करावे, याची माहिती आधीच करून घ्यावी. भाडेकरू व मालक यांच्यामधील नाते सुरक्षित व चोख असलेले बरे. घाईघाईत घेतलेला निर्णय, ब्रोकरवर अंधपणे ठेवलेला विश्वास आदी कारणांमुळे बर्याच मालकांना संघर्ष करावा लागतो. काही वेळा कोर्टामध्ये दादही मागावी लागते.
अशी वेळ येण्यापेक्षा आधीपासूनच योग्य ती काळजी घेणे केव्हाही चांगलेच असते. नंतर गोत्यामध्ये येण्यापेक्षा पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. शहराभोवती विस्तारणार्या उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात परराज्यांतून नागरिक स्थायिक होत आहेत. त्यामधील बहुतांशी नागरिक शिक्षण, नोकरी व व्यवसायाकरिता येतात. जागा भाडेतत्त्वावर घेऊन वास्तव्य करतात, परंतु काही अपप्रवृत्तीचे नागरिक उपनगरामध्ये भाडेतत्त्वावर राहतात. येथे गुन्हा करतात व निघून जातात.
त्यामुळे उपनगरातील जागामालकांनी भाडेकरू ठेवताना फार सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल. भाडेकरूची नोंद पोलीस ठाण्यात करणे बंधनकारक असून, अद्याप नागरिकांनी याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हे अत्यावश्यक आहे. सध्या हा प्रकार बाणेर, बालेवाडी, आैंध आणि अन्य ठिकाणी भाडेकरू सहज मिळावे आणि पूर्ण भाडे आपल्यालाच मिळावे, शासनाला कर भरण्याची गरज पडू नये म्हणून रिकाम्या प्लॉटवर अनेक ठिकाणी भिंती किंवा फक्त शेड उभारून भाडे तत्वावर किराणा दूकाने, रहिवाश्यासाठी घरे शेड उभारण्याचे प्रस्त वाढले आहे.बिहार, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, झारखंड अशा अनेक ठिकाणचे कामगार, मजूर, दूकान व्यावसायिक, भंगार गोळा करणारे खोल्या भाड्याने घेतात.
भाडेतत्वावर राहणारे कोण कोठून आले, त्यांची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक असूनही आपल्याला भाडे कसे मिळेल या हव्यासापोटी मालक खोल्या भाड्याने देत असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. उत्पन्न लपविण्या करिता संबंधीत मालकाकडून भाडे करार तोंडी केला जातो. शासनाच्या नियमानूसार केला जात नाही. काही वेळेस १०० किंवा ५०० रूपयाचे स्टॅम्प साधे लिखाण करून घेऊन भाड्याने दिल्या जातात. परराज्यातून येणारे कामगार, मजूर आणि अन्य व्यवसाय करणारे फार राहतात. यांना भाडे करार कसा करावा, कोठे करावा किंवा कोणते कागदपत्रे लागतात याची माहीती नसते फक्त भाडेकरार नियमाने केल्यास जास्त खर्च येतो अशा भावना त्यांच्या मनावर बिंबविल्या जातात. याचाच फायदा घर मालक घेताना दिसत आहे. याची कल्पना पोलीसांना असते तेही याचा फायदा घेत घर मालकाकडून हप्ते घेऊन चूप बसतात हे अत्यंत घातक आहे. परराज्यातून येणारे गून्हेगार आहे का? याची पडताळणी सूध्दा केली जात नाही.
औंध, बाणेर विभागात घर भाड्याने सहज मिळते याची जाणीव गून्हेगार वृतीच्या लोकांना माहीती मिळते. भाडेतत्वावर घरे किंवा दूकाने दिलेल्या लोकांना नळ कनेक्शन, वीज मीटर सहज मिळते. या लोकांना सूविधा कशा दिल्या जातात हा संशोधनाचा विषय आहे. यात पोलीस, एम एसईबीचे अधिकारी, मनपाचे अधिकरी हात धूवन घेत असल्याचे सुत्रांकडून समजते. यामूळे सर्व मूभा घर मालकांना दिल्याचे दिसते. कर भरावा लागेल म्हणून घरे, दूकाने भाडे करार नियमानूसार होत नाही. हे प्रकार या भागात राजरोसपणे सूरू आहे. यावर कोणाचेही बंधन नाही.
घर मालकांना भाडे भरपूर मिळते ते फक्त भाडे कसे मिळेल या नादात घरे भाड्याने देत आहेत पण याचा गंभीर परिणाम म्हणजे वेशाव्यवसाय करणारे सूध्दा राहत असल्याचे निर्दशनास येत आहे. मोठे गून्हेगार सुद्धा राहात असतील याची कल्पना पोलीस विभागाला नसू शकते ? घर भाड्याने देत असतांना करारनामा नियमानूसार केला गेला की नाही आणी कोठले भाडेकरू राहतात याची नोंद स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावे लागते पण हे नियमाने नसल्यामूळे आणि उत्पन्न लपविण्याच्या नांदात तसेच हप्ते गोळा करण्याच्या नादात एखादा गुन्हा घडला की मग यंत्रणा जागी होते. पोलीस यंत्रणा आणि खोली मालकांकडून अघोरी प्रकार सूरू आहे. असल्या कर बूडव्या मालकावर वरिष्ट पोलीस अधिकारी यांनी कारवाई करणेच इष्ठ ठरेल.
शहरात सोनसाखळीचोर, दुचाकी चोरटे, बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करणारे यांच्यावर कारवाई केली जात आहे. यामधील काही आरोपी हे परजिल्ह्यातील असून, ते येथील उपनगरामध्ये भाडेतत्त्वावर राहात होते. ही बाब समोर आल्यामुळे उपनगरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात घरे भाड्याने दिली जातात. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार, विद्यार्थी आणि बांधकाम मजूर येथे राहतात. घरमालकांनी जागा भाड्याने देताना भाडेकरूची चौकशी करणे आवश्यक आहे.