कृषीमंत्री दादा भुसेंनी पक्षनिष्ठेला पायदळी तुडवत गाठलं गुवाहाटी!

मुंबई : (Dada Bhuse Going To Guwahati) सोमवार दि. २० रोजी माध्यमांमध्ये कृषीमंत्री दादा भुसे नॉट रिचेबल या आशयाचे वृत्त येत होते. मात्र, भुसे आपल्या शासकीय निवासस्थानी होते. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीसही ते उपस्थित होते. भुसे, राठोड यांनी मुख्यमंञ्यांना एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. मात्र माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. प्रस्ताव घेऊन जाण्याएवढा मोठा नेता नाही.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे काय निर्णय घेणार या विषयी मतदार संघासह जिल्ह्यात उत्सुकता होती. धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरीत होवून शिवसेनेच्या मुशीत वाढलेल्या भुसे यांचे शिंदे यांच्याशी मैत्रिपूर्ण संबंध सर्वश्रूत आहेत.

त्या पार्श्वभुमीवर पक्षनिष्ठा की मित्रप्रेम हा निर्णय घेणे म्हणजे भुसे यांच्यासमोर मोठे धर्मसंकट होते. दुसरीकडे पक्ष नेतृत्वाने अतिशय अटीतटीच्या वेळेत कृषीमंत्री पदाची जबाबदारी सोपवून भुसे यांच्यावर विश्‍वास दाखविला. मात्र, याच पक्ष निष्ठेला पायदळी तुडवत, भुसे यांनी मित्रप्रेम जपलं आणि शिंदे गटाला सामिल होण्यासाठी थेट गुवाहाटी गाठली आहे.

Prakash Harale: