Ahamad Shahzad On Gambhir and Kohli : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद कोणापासून लपलेला नाही. आयपीएल २०२३मध्ये ते पुन्हा एकदा जगासमोर उघड आले. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर विराट आणि गंभीर मैदानावर आमनेसामने आले. या दोघांच्या वादावर पाकिस्तानचा खेळाडू अहमद शहजादने वादाला भडकवणारे विधान केले.
दरम्यान शहजाद म्हणाला की, “गौतम गंभीर जे काही करतो, त्यातून त्याला विराट कोहलीविषयी इर्षा वाटते. गौतम गंभीर लढण्यासाठी निमित्त शोधत राहतो. यामुळे तो लखनऊ सुपरजायंट्सच्या युवा खेळाडूंचे मन कलुषित करत आहे.” याबरोबरच त्याने आयपीएल दरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडणावर आणखी बरच काही बोलला आहे.
शहजाद पुढे म्हणाला की, जो सध्या जगातील सर्वात मोठा खेळाडू आहे. त्याने कोहलीविरुद्ध दाखवलेले हावभाव योग्य नव्हते. आयपीएलचा एक ब्रँड आहे आणि जर कोणी भारतीय सुपरस्टारला काही म्हणत असेल तर याचा अर्थ ड्रेसिंग रूममध्ये द्वेषाचे वातावरण आहे. गौतम गंभीर हा विराट कोहलीच्या यशावर जळतो.” असे म्हणत त्याने या वादाच्या आगीत आणखी तेल ओतण्याचा प्रयत्न केला.