एअरहोस्टेस रूपल ओगरेचा मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

मुंबई | Rupal Ogrey Murder Case – मुंबईमध्ये (Mumbai) एक धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरीच्या मरोळ परिसरात राहणाऱ्या एका एअर होस्टेसची हत्या करण्यात आली आहे. एअर होस्टेस रूपल ओगरे (Rupal Ogrey) हिची तिच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर आता पोलिसांनी रूपलच्या मारेकऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

छत्तीसगडहून आलेली एअर होस्टेस रूपल ओगरे ही मुंबईत एकटीच राहत होती. तसंच तिची मुंबईमध्ये जास्त ओळखही नव्हती. पण अचानक ती तिच्या घराच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे रूपलची हत्या कुणी केली असेल? असा प्रश्न पोलिसांना पडला होता. तर आता पोलिसांनी मारेकऱ्याला ताब्यात घेतलं असून त्यानं धक्कादायक खुलासा केला आहे.

रूपलच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. त्यावेळी त्यांना एक क्ल्यू मिळाला आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये रूपल राहत असलेल्या इमारतीमध्ये काम करत असलेला विक्रम दिसला. जो सफाई कामगारांच्या ड्रेसमध्ये ड्युटीवर आल्याचं दिसून आलं. पण नंतर त्यानं इमारतीतून परतताना दुसरे कपडे घातले होते. तसंच विक्रमच्या हातावर आणि गळ्यावर जखमा देखील होत्या. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला.

पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्यानं गुन्हा कबूल केला. आरोपी विक्रमनं रूपलवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला बलात्कार करता न आल्यामुळे त्याने तिची हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी आता रूपलवर बलात्कार झाला की नाही याची माहिती घेण्यासाठी तिच्या शरीराचे फॉरेन्सिक स्वॅब घेतले आहेत.

admin: