“बाळासाहेबांनी कॉंग्रेस सोबत युती स्थापन केली होती …” अजित पवार

मुंबई : balasaheb Thackerey Birth Anniversary Ajit Pawar : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तैलचित्र अनावरण कार्यक्रमात अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय आयुष्यातील महत्वाच्या घटनांची आठवण करून दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी कॉंग्रेससोबत देखील युती केली असल्याचं देखील त्यांनी सांगितले. (Ajit pawar)

“आणीबाणीच्या काळात बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांना पाठींबा दिला होता. प्रतीभाताई पाटील आणि नंतर प्रणव मुखर्जी यांना देखील मोठ्या मनाने पाठींबा दिला होता. बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदयसम्राट तर होतेच मात्र कर्तृत्वसम्राट, वक्तृत्व सम्राट, पत्र सम्राट, कला सम्राट, मैत्री सम्राट होते. ते राजकारण, समाजकारण, कलेच्या क्षेत्रात चक्रवर्ती सम्राट होते. ते सर्व धर्मांचा आदर करत होते.”

“१९७२ -७३ मध्ये बाळासाहेबांनी RPI सोबत युती केली होती. एकेकाळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी मुस्लीम लीगचा देखील पाठींबा घेतला होता. बाळासाहेब मुस्लीम विरोधक होते असं बिलकुल नाही. मात्र, ते पाकिस्तान धार्जीन्यांच्या विरोधामध्ये नक्की होते.”

“शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात व्यवहारापलीकडची मैत्री होती. त्यांनी संजय दत्तला मदत करण्यात त्यांना दुसरा कोणताही उद्देश्य नव्हता. बाळासाहेबांकडे मनाचा मोठेपणा होता. अनेक आंतरराष्ट्रीय कलावंत मातोश्रीवर भेट देत होते. बाळासाहेबांच मोठेपण आपण सर्वांनी जपलं पाहिजे. सर्व पक्षांचे नेते देखील हक्काने मातोश्रीवर येत. त्याकाळात राजकारणात अहंकार, कपटबुद्धी नव्हती.” अशाप्रकारे कोणतीही राजकीय टीका टिपणी न करता अजित अपवर यांनी आपले भाषण केले.

Dnyaneshwar: