पुणे : (Sunil Shelake On Devendra Fadnavis) काल देहू येथे पंतप्रधान यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र, हा सोहळा गाजला तो वेगळ्याच कारणांसाठी तो म्हणजे, कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आल्यामुळे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेते मंडळींनी नाराजी व्यक्त केली. आज राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनी अजित दादा यांच्या कापलेल्या भाषणाचे मास्टर माईंड देवेंद्र फडणवीस असल्याची टीकाही शेळके यांनी केली आहे.
दरम्यान पुढे बोलताना शेळके म्हणाले, हा सर्व कार्यक्रमच भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचा होता. या सोहाळ्यात वारकऱ्यांनाही मान मिळाला नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देहूत संत तुकारामांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण झाले आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी का नाकारण्यात आली होती? हा तर महाराष्ट्राचा आपमान असल्याचे त्या म्हणाल्या.